Bol Maharashtra
Last 24 Hour ब्रेकिंग

युवा सेनेच्या संजय भोयर यांच्या उपोषणाची सांगता,जिल्हा प्रमुख राजुदास जाधव यांची सोडवले उपोषण…!

आपली कुठलीही संमती न घेता शेत पिकाची नुकसान भरपाई दुसऱ्या खात्यात जमा केली,नियमबाह्य पद्धतीने गोठा पाडून संमती न घेता घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी तत्कालीन ग्रामसेवकाने बनावट आठ अ केल्याची चौकशी करून दोषी विरुद्ध कारवाई करावी या मागणी साठी युवा सेनेचे संजय भोयर यांनी तहसिल कार्यालया समोर पाच दिवसा पासून उपोषण सुरू केले होते.

उपोषणाची दखल घेत आर्णी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खारोदे यांनी एक समिती नेमून मोक्का पहानी केली व उपोषण कर्त्यास समजून सांगितले. व चुकीचे आढळून आले तर दोषी विरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

आज यवतमाळ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजुदास जाधव यांनी उपोषण मंडपात संजय भोयर याची भेट घेतली व तहसीलदार आर्णी व गटविकास अधिकारी यांना फोन वरून संपर्क साधला.

व नियमानुसार तातडीने कारवाई करावी असे सांगितले त्यावरून जिल्हा प्रमुख राजुदास जाधव यांच्या हस्ते संजय भोयर यांनी उपोषण मागे घेतले.

यवतमाळ जिल्हा शिवसेना सह संपर्क प्रमुख व पंचायत समितीचे माजी उपसभापती रवी राठोड,शेतकरी सेनेचे प्रमोद कुदळे,माजी  सभापती गणेश हिरोळे,अनिल गेडाम,रब शेख, हर्षद भगत,उत्तम राठोड,गुड्डू देठे ,राहुल लाभाषेटवार यांनीही यावेळी उपोषणकर्ता संजय भोयर यांची समजूत काढली

यावेळी विस्तार अधिकारी ईश्वर बघेल यांनी मोठा पुढाकार घेतला. सोबत पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी इंगोले,कृषी विस्तार अधिकारी जुडे  आर्णी पोलीस स्टेशन चे गोपनीय शिपाई रवी हे उपोषण सोडवण्यासाठी उपस्थित होते

Related posts

शिरूर नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादीच्या ऐश्वर्या पाचर्णे,भाजप चे मात्र सभागृहात वर्चस्व..!

bol maharashtra

अखेर माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद सदनिका घोटाळ्यात गेलेच…!

bol maharashtra

पहिल्यांदाच नगरसेवक अन गट नेता म्हणून काँग्रेस पक्षाने दिली बक्षिसी…!

bol maharashtra