Bol Maharashtra
Last 24 Hour निवडणूक ब्रेकिंग मोठी बातमी

पहिल्यांदाच नगरसेवक अन गट नेता म्हणून काँग्रेस पक्षाने दिली बक्षिसी…!

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे आर्णी शहराध्यक्ष अमोल मांगूळकर  हे आर्णी नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून नगरसेवक म्हणून निवडून पहिल्यांदा विजयी झाले.पक्षा वरील त्यांची निष्ठा खासदार प्रतिभा ताई धानोरकर व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे लाडके व महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे राज्य उपदयक्ष अरीज बेग याचे जिवलग सहकारी म्हणून अमोल मांगूळकर यांना काँग्रेस पक्षाने बक्षिसी दिली असून सभागृह गटनेता म्हणून त्यांची निवड करण्यात आली.

सभागृहात पक्षाचा आदेश बजावणे पक्षाचे धोरण ठरवणे असे महत्वाचे अधिकार गटनेत्यांच्या अधिकारात येतात.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आर्णी नगर परिषदेच्या गटनेते पदी श्री अमोल मांगुडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली
या प्रसंगी नवनियुक्त नगर अध्यक्ष श्री नालंदा भरणे, नगरसेवक शफी भाई मलनस,, नगरसेवक रियाज सैय्यद, नगर सेविका यास्मिन शाह, नगर सेविका नीता ठाकरे, नगर सेविका भावना मुनेश्वर नगरसेविका अश्विनी राऊत
नगर सेविका प्रीती शिवरामवार, संजय राऊत, ,दीपक देवतडे, जयराज मुनेश्वर, रहेमान शाह, खुशाल ठाकरे, आरिफ बैलीम , सलमान शेख,इत्यादी मान्यवर उपस्थित होते

 

Related posts

भंगारा च्या दुकानास भीषण आग,शिक्रापूर येथील घटना

bol maharashtra

जाग्यावर सोडवला प्रश्न,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्परता…!

bol maharashtra

मूर्ख कोण प्रशासकीय अधिकारी की राजकारणी…

bol maharashtra