Bol Maharashtra
निवडणूक बिना केटेगरी

किंग मेकर साजिद बेग यांची विजयी घोडदौड, बँक प्रतिनिधी म्हणून अविरोध निवड…!

यवतमाळ जिल्हा मद्यवर्ती सहकारी बँक ची निवडणुकी चे वारे वेगात वाहत असून त्यासाठी निवडून द्यायच्या संचालक मंडळास मतदान करण्यासासाठी विविध सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून बँक प्रतिनिधी यांची निवड करण्यात येते.

पूर्वाश्रमी चे काँग्रेस चे नेते साजिद बेग हे किंग मेकर म्हणून आर्णी च्या राजकारणात ओळखल्या जातात. त्यांनी काँग्रेस पक्षाला ‘हाथ’ दाखवत बाय बाय केला अन आर्णी नगरपरिषद मध्ये पूर्ण शक्ती पणाला लावत ८ नगरसेवक निवडून आणले. आणि आपल्या नेतृत्व गुणांचे कौशल्य सिद्ध केले.

आता आर्णी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी  मधून बँक प्रतिनिधी ची निवड होती पण या निवडणुकीत कोणीही साजिद बेग यांच्या विरुद्ध अर्ज दाखल केला नाही.त्यामुळे त्यांची अविरोध निवड घोषित करण्यात आली.

या मुळे आज साजिद बेग यांच्या निवासस्थानी जात अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.आज त्यांचे स्वागत करण्यासाठी यवतमाळ जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील,आर्णी चे प्रथम नगरादयक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल आडे, जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे माजी जिल्हा अद्यक्ष विलास पाटील, सादिक शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे आर्णी तालुकाध्यक्ष सुनील पोतगंटवार,शहर अद्यक्ष सुरेश मोरलेवार,रामेश्वर चौधरी,काँग्रेस चे माजी तालुकाध्यक्ष सुनील भारती, शेखर खंदार, नवनिर्वाचित नगरेवक माजी नगरपरिषद सभापती अनवर पठाण, नगरेवक अशपाक शेख,शेतकरी सेनेचे प्रमोद कुदळे,जावेद सोलंकी, युनूस शेख,राधेश्याम पाटील वानखडे, परवेज बेग,निलेश बुटले, अश्वजित गायकवाड, स्वप्नील राठोड,आलिम देशमुख, यांच्या सह शेकडो राजकीय सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. अनेकांनी फोन द्वारे साजिद बेग यांचे अभिनंदन केले.कमी कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस पद मिळवत स्वतःला सिद्ध करणाऱ्या व उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य मंत्री इंद्रनील नाईक यांच्या गुड बुक मध्ये साजिद बेग  यांनी स्थान निर्माण केले आहे.

Related posts

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज ( पारवा येथे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा एल्गार)

bol maharashtra

आधी आवेशात दादांना आव्हान आता मागितली माफी..!

bol maharashtra

शिक्रापूर येथे सर्वपक्षीयाकडून अजित दादा पवार यांना श्रंधाजली अर्पण.!

bol maharashtra