Bol Maharashtra
बिना केटेगरी

नवनिर्वाचित नगर सेवक ठरत आहे,तत्पर समाजसेवक…!

नगर सेवक हा प्रभागातील विकास स्वच्छता यासाठी काम करत असतो.आर्णी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग ५ मधू न राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस साजिद बेग यांच्या मार्गदर्शनात विजयी झालेले अशपाक शेख हे तत्परतेने कामाला लागले असून अल्पावधीतच ते नागरिकाचे सच्चे नगरसेवक व समाजसेवक ठरत आहेत.

 : प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक अशफाक शेख हे खरे जनसेवक म्हणून परिसरात ओळख निर्माण करत आहेत. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी तत्पर असून लोकांशी सतत संपर्कात राहून त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
“मला कधीही कॉल करा, तुमची कामे करण्यासाठी मी नेहमी तयार आहे,” असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. निवडून आल्यानंतर ते दररोज सकाळी सहा वाजता उठून नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेतात. त्यामुळे नागरिकदेखील हक्काने आपल्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवतात.
नाली सफाई, कचरा स्वच्छता, बंद पडलेले लाईट तसेच इतर नागरी समस्यांवर ते तात्काळ तोडगा काढत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सर्वधर्मसमभाव ही त्यांची विशेष ओळख असून ते सर्व समाजाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात.
प्रभाग क्रमांक ५ चा सर्वांगीण विकास करून नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हाच आपला मुख्य उद्देश असल्याचे नगरसेवक अशफाक शेख यांनी सांगितले.

Related posts

अखेर माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद सदनिका घोटाळ्यात गेलेच…!

bol maharashtra

बाबा कंबलपोष यांच्या वरील अतूट श्रद्धा व भक्तीने कारंजा वरून नग्रेसवक सायकल ने पोहचले दर्शनाला…!

bol maharashtra

सशक्तराष्ट्र निर्मितसाठी युवकांची संघटित शक्ती आवश्यक :ना. संजय राठोड

bol maharashtra