Bol Maharashtra
सामाजिक

शिक्रापूर , सणसवडी वाहतूक कोंढी सुटणार कधी? सर्वसामान्य जनतेचा प्रश्न..!

प्रतिनिधी

पुणे (रांजणगाव गणपती)
शिक्रापूर , सणसवडी वाहतूक कोंढी सुटणार कधी? सर्वसामान्य जनतेचा प्रश्न..!

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, सणसवाडी,रांजणगाव गणपती परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, रोजच्या ट्रॅफिक समस्येमुळे मानसिक त्रास सहन करण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. झपाट्याने वाढलेले औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या आणि अपुरी रस्ते व्यवस्था यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे.
औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा वाढली आहे. मात्र त्यानुसार रस्त्यांचे रुंदीकरण, पर्यायी मार्ग किंवा ट्रॅफिक नियोजन करण्यात प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. परिणामी सकाळ व संध्याकाळच्या वेळी मुख्य मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागतात.
कामावर जाणाऱ्या कामगार वर्गाला दररोज घरातून लवकर निघावे लागत असून, रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना तसेच विद्यार्थ्यांना देखील प्रचंड सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ दुप्पट होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढताना दिसत आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदने व पत्रव्यवहार करूनही केवळ आश्वासनांवरच प्रश्न अडकून राहिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कागदोपत्री निर्णय होत असले तरी प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल दिसत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
दरम्यान, वाढत्या ट्रॅफिक समस्येमुळे औद्योगिक विकासावरही परिणाम होत असल्याची चर्चा सुरू आहे. भविष्यात नवीन उद्योग येण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विद्यमान उद्योग स्थलांतरित झाल्यास स्थानिक रोजगार, हॉटेल व्यवसाय, फेरीवाले व छोट्या दुकानदारांवर मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो.
नागरिकांनी प्रशासनाने तातडीने वाहतूक नियोजन, रस्त्यांचे रुंदीकरण व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आह

रांजणगाव परिसरातील मुख्य रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण
अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गाची निर्मिती
ट्रॅफिक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती
औद्योगिक वसाहतीसाठी पर्यायी बायपास रस्ता
सिग्नल व्यवस्था व वाहतूक नियोजन त्वरित लागू करणे इत्यादी मागणी जोर धरत आहे

या दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे शिरूर तालुका कार्याध्यक्ष संदिप ढाकुलकर यांनी या बाबतीत शासनास निवेदन देणार असून या समस्येसाठी लवकर प्रहारच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे

Related posts

स्मार्ट मिटर व थकीत वीजबिलासाठी आर्णी विजविरण ची जागृती मोहीम…!

bol maharashtra

राज्य मराठी पत्रकार परिषद शिरूर ता. नवीन कार्यकारणी जाहीर

bol maharashtra

गोरक्षकांनी दिले ६२ गाईंना जीवदान,पोलिसांनी केली सुटका…!

bol maharashtra