Bol Maharashtra
सामाजिक

कष्टकरी माणसाचा आवाज बाबा आढाव निवर्तले…!

संघटरीत कामगार श्रमिक ज्यांच्या साठी कोणी पुढे येत नव्हते त्या शिक्षा चालक,हमाल,बांधकाम कामगार यांना संघटित करून प्रदिर्घ लढा लढत न्याया साठी पूर्ण आयुष्य वाचणारे बाबा आढाव हे वयाच्या ९६ व्या वर्षी निवर्तले..काही दिवसा पासून ते आजारी होते त्यांच्या वर नया पुना येथे रुग्णालयात उपचार सुरू होते .

त्यांच्या निधनाने चळवळी चा एक दीपस्तंभ हरवला राज्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. बाबा आढाव गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. बाबा आढाव यांचे सामाजिक कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी होते. त्यांनी कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी कष्टकरी मजुरांचे संघटन करून त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यांचा जीवन प्रवास सविस्तर जाणून घेऊयात.

पुण्यात जन्म
बाबा आढाव यांचा जन्म १ जून १९३० रोजी पुणे येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव असे आहे. ते एक सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी असंघटित कामगारांसाठी आयुष्य वेचलं. तसेच त्यांनी साहित्य क्षेत्रातही योगदान दिले.त्यांनी रिक्षाचालक, हमाल, हातगाडी ओढणारे आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी मोठा लढा दिला.

हमाल पंचायतीची स्थापना करून ते हमलांच्या हक्क साठी लढले
पुणे शहरात त्यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे आणि त्यांना आदराने ‘पुणे शहराचे कुटुंब प्रमुख’ असेही म्हटले जाते. त्यांनी पुणे येथे ‘हमाल पंचायत’ आणि ‘असंघटित कामगार कर्मचारी महासंघ’ यांसारख्या संस्था स्थापन केल्या. अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ ही चळवळ सुरू केली, जी अत्यंत गाजली. त्यांनी दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठीही काम केले. बाबा आढाव यांनी सामाजिक विषयांवर आणि आपल्या चळवळींवर आधारित अनेक पुस्तके आणि लेख लिहिले आहेत. त्यांच्या जाण्याने राज्यातील सर्व नेत्यांनी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दुःख व्यक्त केले.

Related posts

शिक्रापूर (कोयाळी ) गावठाण येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी ..!

bol maharashtra

तपोवनाच्या वृक्षांना हरित लवादा ची ढाल..!

bol maharashtra

वाढीव गृहकरामुळे जनतेत तीव्र असंतोष शेकडो तक्रारी दाखल; 29 डिसेंबरला सुनावणी

bol maharashtra