Bol Maharashtra
गुन्हा

अखेर अनवर पठाण यांची तक्रार खरी ठरली,एम डी ड्रॅग चा पर्दाफाश…!

आर्णी शहरात व तालुक्यात एम डी ड्रॅग चा मोठा व्यवसाय असून त्यामुळे तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी या नशेच्या जाळ्यात अडकत असल्याने नगरपरिषद स्वछता व आरोग्य सभापती अन्वर पठाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक आर्णी यांना लेखी निवेदन दिले होते.

मात्र त्यावेळी ही तक्रार गंभीर्य पूर्वक न घेता दुर्लक्षित होते की काय असे वाटत असताना अडाणी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बारीक पाळत ठेवली आणि अखेर काल एका गोपनीय माहितीच्या आधारे आर्णी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने माहूर रोड वरील एका धाब्यावर सापळा रचून  एम डी ड्रॅग सदृश्य नशेचे २०-२५ किलो पावडर जप्त करून धाबा चालकाला ताब्यात घेतले.

पोलिसांनी यवतमाळ येथून फॉरेन्सिक चमू ला बोलावले असून जप्त केलेले पावडर नेमके कोणते व त्याची किंमत किती

या मागे मुख्य सूत्रधार कोण व किती लोकांचा सहभाग आहे ते आता पुढील तपासात समोर येणार आहे.कदाचित या प्रकरणी धागेदोरे आंतरराजयीय असण्याची श्यक्यटा व्यक्त होत आहे.

काही दिवसा पूर्वी तक्रारदार अन्वर पठाण यांना पब्लिसिटी स्टंट म्हणारे कथित आता तोंडघशी पडले आहेत व त्यांनी जनहीत पाहत केलेली तक्रार योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे.

Related posts

आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी येथील जन्म मृत्यू नोंद,बिहार च्या दुबेला अटक,किरीट सोमय्या काय भूमिका घेणार…?

bol maharashtra

दोन वर्षापूर्वीची यश गायकवाड हत्या प्रकरण उघड करण्याची ग्रामस्थ आणि नातेवाईक यांची मागणी ..!

bol maharashtra

तलवारींसह दोन गट आमनेसामने; पांढरकवडा पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

bol maharashtra