Bol Maharashtra
खेळ

खेळाडूंसाठी जयहिंद मंडळाची भूमिका कौतुकास्पद:ना.संजय भाऊ राठोड

यवतमाळ येथील अभ्यंकर शाळेच्या प्रांगणात नव जयहिंद मंडळ, यवतमाळ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यास यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व मृद व जलसंधारन मंत्री ना.संजय भाऊ राठोड यांनी उपस्थित राहून विजेत्या खेळाडूंना बक्षिसे प्रदान केली.

क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जयहिंद मंडळाने घेतलेला पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे असे यावेळी ते म्हणाले.

महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाने आपल्या आवडीच्या क्रीडा क्षेत्रात पुढे यावे आणि “खेळाडू घडवा – निरोगी समाज घडवा” ही भावना मनात ठेवून प्रयत्नशील राहावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वयक परागभाऊ पिंगळे, एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव मोहनजी गांधी, सलीम खेतानी,
अध्यक्ष विनायकराव बोबडे, जय हिंद मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वानखेडे, विदर्भ खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर निभाळकर, यवतमाळ जिल्हा शिक्षक कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर, नव जयहिंद मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब दौलतकार, खो-खो असोसिएशनचे सचिव संजय इंगळे, तसेच डॉ. विकास टोने, सुनील वानखडे, गणेश मामा भोयर, प्रा. विवेक देशमुख, अजय दंडे, अमित भिसे, बोथे सर आणि अनेक खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

विधान सभा सामान्य निर्वाचन- 2022 को सकुशल सम्पन्न कराने हेतु थाना- शोहरतगढ़ व एसएसबी की संयुक्त टीम ने किया एरिया डोमिनेशन 

Web1Tech

भारतीय संघाने सहाव्यांदा जिंकला विश्वचषक,१९ वर्षा खालील संघाची कामगिरी वैभव ची तुफान फलंदाजी..!

bol maharashtra

पहिल्यांदाच जातेगांव रोड येथील भिल्ल वस्तीत साजरा झाला माहेर संस्थेच्या वतीने बालदिन..!

bol maharashtra