Bol Maharashtra
धर्म - कर्म बिना केटेगरी

पुरातन सिद्धेश्वर मंदिरात फुलांची आकर्षक आरास व रोषणाई, महा आरती संपन्न..

देव दिवाळीनिमित्त सिद्धेश्वर महादेव मंदिर हजारो दिव्यांनी उजळले

महाआरती करण्यात आली

अरुणावती नदीच्या काठावर रमणीय भागात असलेले प्राचीन हेमाडपंती शिवालय, सिद्धेश्वर महादेव मंदिर, हे काल देव दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हजारो दिव्यांनी उजळले.

देव दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, सिद्धेश्वर महादेव मंदिराचे विश्वस्त, सिद्धेश्वर भक्त मंडळ आणि भक्तांनी पहाटेपासून मंदिर स्वच्छ केले, विद्युत दिवे आणि रांगोळीनेमंदिर परिसर सजवले. संध्याकाळी, मंदिरात हजारो दिवे लावण्यात आले, दिव्यांच्या पवित्र प्रकाशाने मंदिराचे सौंदर्य खुलुन दिसत होते. यावेळी, शहराचे दानशुर व्यक्तिमत्व शंकर मारबते यांचे दिवे लावायला सुरवात झाली आणि देव दिवाळी उत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी, हजारो दिवे लावण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण मंदिर प्रकाशित झाले. या उत्सवादरम्यान, सिद्धेश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष मामा ठाकरे, सचिव राजेंद्र नवबासी, ललित पटेल, अनिल चिंतावार आणि सिद्धेश्वर भक्त मंडळाचे सदस्य, शहरातील आदरणीय नागरिकांनी मंदिरात हजारो दिवे प्रज्वलित केले. संध्याकाळी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भव्य महा आरती करण्यात आली. दिव्यांच्या मंद प्रकाशात गाभार्यात फुलांची सजावटिने शिवलिंग पाहताच मंत्रमुग्ध होत होते।

रात्री ८ वाजता भव्य आरती करण्यात आली, ज्यामध्ये शेकडो भाविक उपस्थित होते.

आरतीनंतर प्रसाद वाटप करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर मारबते, मामा ठाकरे, राजेंद्र नवबासी, ललित पटेल, अनिल चिंतावार.

प्रवीण मुनगीनवार, दीपक गंडेचा, जयंत डोल्हारकर, राजेंद्र शिवरामवार, राजेश माहेश्वरी, सिद्धेश्वर भक्त मंडळ, चे श्रेयश गुप्ता, पियुष बेडेकर, अथर्व उपलेंचवार, आकाश मोरे, अर्जुन लोळगे साहिल गुप्ता, लखन भणगे, राज झुनझुनवाला, अभिषेक गुप्ता, ऋषभ दुगड, डॉ.पार्थ पवार, हर्ष गुप्ता, अनिकेत पाटील, कार्तिक कोमेवार,चेतन वानखेडे, यश लाड, श्रावण चव्हाण आदींनी प्रयत्न केले. महाआरतीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

वल्लभ नगर वासियातर्फे नवनिर्वाचित उपसरपंच त्रिनयन कळमकर यांचा सत्कार

bol maharashtra

बंजारा समाजाची संस्कृती,विरासत जपण्यासाठी संजय राठोड यांनी केलेले परिश्रम उल्लेखनीय…!

bol maharashtra

गड कोट मोहिमेसाठी आर्णी तालुक्यातील १०० धारकरी रवाना..!

bol maharashtra