Bol Maharashtra
महाराष्ट्र

पोहरागड विकासात ना.पाठपुराव्याला आणखी यश,८४ लाख भोगवटा मूल्य शासनाने केले माफ..

पोहरादेवी तालुका मनोरा जिल्हा वाशिम हे बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे देशातील सर्व बंजारा समाजासाठी हे श्रद्धेचे ठिकाण असून येथे बंजारा समाजाचे सांस्कृतीक,पौराणिक ऐतिहासिक वारसा दर्शना साठी देसजातील एकमेव नंगारा भवन उभे करून संत श्रेष्ठ सेवालाल महाराज,संत डॉ.कै. रामराव बापू यांच्या समाधी स्थळाचा सर्वांगीण विकासासाठी नामदार संजय राठोड यांनी पाठपुरावा करून शेकडो कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.आता येथे सुसज्ज भक्त निवास त्या ठिकाणी उभे राहणार आहे.
पोहरादेवी भक्तनिवास प्रकल्पाला वेग, शासनाकडून ८३.३० लाख भोगावटामूल्य माफ

मौजे वाईगोळ (ता. मानोरा, जि. वाशिम) येथील गट नं. ५५८ मधील १.५२१६ हे.आर. जागा ग्रामपंचायतला भक्त निवास व यात्रेकरूंसाठी देण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मृद व जलसंधारन मंत्री ना.संजय राठोड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या जागेच्या ताब्यासाठी लागणारे ₹ ८३,३०,०००/- भोगवटामूल्य शासनाने माफ केल्याबद्दल शासनाचे मनापासून आभार!

या निर्णयामुळे पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासाला नवे बळ मिळाले असून, धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.

Related posts

बिबट्याला हद्दपार करण्यासाठी शेतकरी एकवटले..!

bol maharashtra

शिवसेना उबाठा समोर नवा पेच…भास्कर की आदित्य..? आदित्य ठाकरेंनी वृत्त फेटाळले…!

bol maharashtra

डॉ.नीरज वाघमारे यांच्या पुढाकाराने पोलीस भरती मार्गदर्शन मेळावा; प्रा.विठ्ठल कांगणे यांचे सखोल मार्गदर्शन

bol maharashtra