Bol Maharashtra
खेळ

पहिल्यांदाच जातेगांव रोड येथील भिल्ल वस्तीत साजरा झाला माहेर संस्थेच्या वतीने बालदिन..!

वार्ताहर ✍🏻 संदीप ढाकुलकर

*#पहिल्यांदाच जातेगांव रोड येथील भिल्ल वस्तीत साजरा झाला माहेर संस्थेच्या वतीने बालदिन!#*….

काल दिनांक 08 नोव्हेंबर 2025, शनिवार रोजी,शिक्रापूर, जातेगांव रोड येथील भिल्ल वस्ती येथे बालदिनाचे औचित्य साधून माहेर संस्थेच्या वतीने बालमेळावा घेण्यात आला.
सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करून मुलांसाठी विविध खेळ घेण्यात आले,मुलांनी उस्फुर्त पणे यात सहभाग घेतला त्यांना हे खेळ खुप आवडले. व विजेत्यांना व सर्वं सहभागी मुलांना विशेष भेट वस्तू देण्यात आली.
याकार्यक्रमासाठी माहेर संस्थेच्या
विश्वस्त डॉ. निकोला जयंत पवार,जर्मनी मधून आलेले माहेर संस्थेचे मित्र परिवार व शुभचिंतक उपस्थित होते. आणि सौ.कुसुम ताई मांढरे यांनी मुलांसाठी गिफ्ट दिले .मुलांना खाऊ देण्यात आला. पहिल्यांदाच भिल्ल वस्तीतील मुलांसाठी कार्यक्रम झाल्या मुळे तेथील महिला व सर्वं आनंदी व खूष होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन सौ. तेजस्विनी पवार कला कौशल्य व स्वावलंबन प्रकल्प प्रमुख यांनी केले तरी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साठी मिनी एम जे;जयश्री पळसे , निर्मला तोडकर, सीमा सावंत, राजु तायडे, राजु साकोरे,प्रकाश कोठवळे विक्रम भुजबळ, सुशील पोहेकर यांनी विशेष सहकार्य लाभले.

Related posts

ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आर्णी पोलीस स्टेशन मधून क्रिकेट चा थरार…ए.पी.ए.चे आयोजन…

bol maharashtra

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनो, आताच मोबाईलवर तपासा मेसेज; मिळेल खूष करणारी बातमी

Web1Tech

भारतीय फिरकी चा जादूगर हरभजनसिंग…!

bol maharashtra