राज्य मराठी पत्रकार परिषद शिरूर ता. नवीन कार्यकारणी जाहीर;
शिरूर (प्रतिनिधी) संदीप ढाकुलकर
राज्य मराठी पत्रकार परिषद पश्चिम महाराष्ट्र अंतर्गत पुणे विभागीय जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन शिरूर तालुका कार्यकारणी निवडीसाठी श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे रविवार दिनांक (१४ डिसेंबर) रोजी करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य मराठी पत्रकार परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकार विजयराव ज्ञानेश्वर लोखंडे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून पुणे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार विजय अशोक थोरात उपस्थित होते.
यावेळी झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत शिरूर तालुका अध्यक्ष एकनाथ थोरात यांची पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली. तसेच शिरूर तालुका अध्यक्षपदी आकाश वडघुले, तालुका उपाध्यक्षपदी शुभम वाकचौरे व सुधीर खोमणे, शिरूर शहर प्रमुखपदी प्रदीप रासकर, उप शहर प्रमुखपदी बाळासाहेब जाधव, खजिनदारपदी दत्तात्रय जायकर, सचिवपदी संदीप ढाकुलकर, संपर्कप्रमुखपदी गणेश सिनलकर तर संघटकपदी राहुल पाचर्णे यांची निवड करण्यात आली. यासह अनेक पत्रकार सदस्यांची विविध पदांवर निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकार विजयराव लोखंडे यांनी पुढील काळात शिरूर हवेली मतदारसंघात पत्रकार भवन उभारण्यासाठी शासन स्तरावर पत्रव्यवहार करून आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती दिली.तसेच पत्रकारांच्या हितासाठी संघटना अधिक सक्षम, संघटित व परिणामकारक बनविण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तर पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय थोरात यांनी आगामी आर्थिक वर्षात पत्रकार संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मत व्यक्त केले.पत्रकारांनी समाजातील दैनंदिन प्रश्न निर्भीडपणे मांडावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीस तालुक्यातील ज्येष्ठ व युवा पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून केंद्रीय संस्थापक अध्यक्ष मधुसुधन पाटील साहेब, विभागीय अध्यक्ष नितीन करडे,पुणे जिल्हाध्यक्ष हभप सचिन महाराज माथेफोड यांनी अभिनंदन केले असून पत्रकार क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना उपस्थितां मधून व्यक्त होत आहे.
“राज्य मराठी पत्रकार परिषदेसारख्या प्रतिष्ठित संघटनेत मला दिलेली जबाबदारी ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी, त्यांच्या समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि संघटनेला अधिक मजबूत करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन. सर्व पत्रकारांना न्याय, सुरक्षा व सन्मान मिळावा, यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातील.”
श्री.आकाश वडघुले (अध्यक्ष-राज्य मराठी पत्रकार परिषद शिरूर तालुका)
