Bol Maharashtra
कृषी

नुकसानग्रस्त केळी व डाळिंब बागांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

**माढा ता. प्रतिनिधी – दिपक लांडगे**

माढा तालुक्यातील कोंढारभाग परिसरात अलीकडील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या केळी व डाळिंब बागांची आज सोलापूर जिल्हाधिकारी **श्री. एस. कार्तिकेन** यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व व्यथा जाणून घेतल्या.

शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. तसेच पंचनामे करून नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या पाहणी दौऱ्यात मंडल अधिकारी **मुंडे साहेब**, तलाठी **बोराटे साहेब**, **पाटील साहेब**, **बाळू कांबळे**, **गुटाळ भाऊसाहेब**, केळी उत्पादक **जितेंद्र गायकवाड**, **राजेंद्र पाटील**, **अमोल देवकते**, **उद्धव केचे** तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना देत शासनस्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.

Related posts

शेतकरी हिताला प्राधान्य: अनिल आडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती

bol maharashtra

बळीराजाचा वीजपुरवठ्यासाठी एल्गार; आर्णी महावितरण कार्यालयात निवेदन सादर 

bol maharashtra

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला महसूल विभागाच्या मिशन उभारी ने दिली मायेची ऊब…!

bol maharashtra