Bol Maharashtra
सामाजिक

आर्णी येथील रक्तदान शिबीरात.. ११२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

आर्णी येथील रक्तदान शिबीरात.. ११२ रक्तदात्यांनी केले रक्तदान

तालुका प्रतिनिधी आर्णी

आर्णी :
जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला आसतांना आर्णी शहर हे नेहमीच रक्तदान शिबीर घेण्यात जिल्ह्यात प्रथम स्थानी असते येथील विविध सामाजिक संस्था रक्तदान शिबिर घेऊन मोलाचा वाटा उचलत असतात.
येथील रोटरी क्लब ऑफ आर्णी च्या वतीने जुन्या यवतमाळ अर्बन बँकेच्या जागेवरील हॉल मध्ये व फुलो झानो शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन रोटरी क्लब ऑफ आर्णी च्या सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले. तर फुलो झानो शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील रक्तदान शिबीराचे उद्घाटन प्राचार्यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन्ही जागेवरील रक्तदान शिबिरात शहरातील. ११२ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. या रक्तदान शिबीरासाठी यवतमाळ येथील शौर्य ब्लड सेंटरचे डॉ. प्रमोद राठोड, डॉ शिवशंकर भताने, जया आडे, श्रृती कटरे, कल्याणी पटले, रूतुजा मडके, रोशनी कटरे, सुरज मगर, प्रथमेश बनसोड यांनी सहकार्य केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्रीपाल कोठारी, अमित मोतेवार, नासीर खाकरा, स्वप्निल दुगड, अमन बेग मिर्झा, हिमांशु राठी, प्रयास छल्लाणी, राजेश नालमवार, सतिश केशववार, डॉ. हार्दिक जैन, यश लिंगावार, अक्षय चिंतावार, अर्थव लोळगे, अथर्व चिंतावार, निरज लोया, श्रीनिवास कोषटवार, शानवाज बेग, निखील बेलगमवार, अजिंक्य चिंतावार यांनी परिश्रम घेतले.

Related posts

सीमा त्रिनयन कळमकर जिल्हा परिषदेच्या आखाड्यात. वाढता प्रतिसाद..!

bol maharashtra

‘अनाथांचा नाथ एकनाथ’ याची प्रचिती संकटात असणाऱ्या राज्यातील लोकांना आला: पराग पिंगळे

bol maharashtra

आर्णी युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम, उर्स मध्ये राबविले स्वच्छता अभियान…!

bol maharashtra