Bol Maharashtra
इतर

नगरपरिषद च्या कर निर्धारणा विरुद्ध प्रवीण मुनगीनवार यांनी थोपटले दंड…!

आर्णी नगरपरिषद कडून नागरिकांना कराच्या मागणी पत्रात अवाच्या सव्वा कर आकारणी केल्याने आर्णी कर नागरिकांच्या मनात रोख निर्माण झाला होता ही स्थिती पाहून व जनभावना लक्षात घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आर्णी नगर परिषद चे माजी गट नेते प्रवीण (अण्णा) मुनगिनवार यांनी दखल घेत दंड थोपटले आहे.
याविषयी त्यांनी नगरपरिषद च्या मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन कर आकारणी च्या पद्धतीवर आक्षेव घेत रितसर माहिती माघीतली होती.
नगरपरिषद कडून लिहीत माहिती घेऊन मग न्यायालयीन लढा लढण्याची भूमिका प्रविण मुनगीणवार यांनी घेतली आहे.
विशेष म्हणजे आर्णी नगरपरिषद च्या आरक्षण सोडतोत देखील त्यांनी नगरपरिषद ला ५०% च्या वर आरक्षण जात असल्याचे प्रशासना चे लक्षात आणून दिले होते. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तूर्तासआर्णी च्या कर आकारनी प्रक्रियेत लढा देण्यासाठी प्रवीण मुनगिनवार यांनी घेतल्या ने सर्व स्तरातून त्यांचे आभार व्यक्त होत आहे.

Related posts

पावसाळा झाला आता पूल देतो अपघाताला निमंत्रन..

bol maharashtra

ग्रामीण विकास मिशन च्या यवतमाळ प्रकल्प संचालक पदी अभिलाष इंगोले नियुक्त.. !

bol maharashtra

अरुणावती नदी वरील लोखंडी कठडे तुटले,अपघाताची श्यक्यता…!

bol maharashtra