Bol Maharashtra
धर्म - कर्म

पं. प्रदीप मिश्रा यांचे आर्णीत शिवपुरान जय्यत तयारी, देणगी कार्यालय होणार सुरू..!

देणगी कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त शहरात भव्य शोभा यात्रा
श्री शिव महापुराण कथेनिमित्त

आर्णी
श्री बहिरम शिव महापुराण सेवा समिती ट्रस्ट, आर्णी आर नं. ८७४, द्वारा ३० मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत आर्णी शहरात सिहोर येथील जगप्रसिद्ध पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने देणगी कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. यानिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरापासून दि 5 डिसेंबरला सकाळी ८:३० वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येत आहे
या देणगी कार्यालयाचे उद्घाटन परमपूज्य श्री सांवरीया बाबा यवतमाळ, परमपूज्य महंत श्री चिंतामणीजी भारती दत्त शिखर माहूर, ह.भ.प. श्री मधुकरराव खोडे महाराज, श्री विष्णू महाराज भानसरा आणि संत माता बोपापूर यांच्या हस्ते शुक्रवार ५-१२-२५ रोजी सकाळी ११.१५ वाजता होत आहे. यापूर्वी यासाठी भव्य मिरवणूक विठ्ठल मंदीर पासून काढण्यात येत आहे . ५ डिसेंबर रोजी शुक्रवार रोजी पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोर यांच्या शिव महापुराण कार्यक्रमाच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी साधू संत, कलशधारी महिला, वारकरी मंडळ, भजनी मंडळ आणि सर्व शिवभक्त विठ्ठल मंदिर, गणपती मंदिर, सराफा लाईन, माहूर चौक, बस स्टँड, शिवनेरी चौकयेथे समारोप होऊन दान कार्यालयात पोहोचतील. त्यानंतर आदरणीय संतांच्या हस्ते दान कार्यालयाचे उद्घाटन होईल. या प्रसंगी, आपणा सर्वांना समिती आणि आर्णी वासियांनी आपल्या कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Related posts

पं. प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवानीतून आर्णीत शिवपूरान आयोजनाची जय्यत तयारी..!

bol maharashtra

विधानसभा सामान्य निर्वाचन के मद्देनजर पुलिस और SSB की सयुंक्त टीम ने किया फ्लैग मार्च्

Web1Tech

भीमा कोरेगाव विजयस्तंभ कार्यक्रमासाठी वाहतूक बदल चाकण, शिक्रापूर, वाघोली मार्गांवर निर्बंध

bol maharashtra