Bol Maharashtra
गुन्हा महाराष्ट्र

मागितली ‘लाच’ पडली ए सी बी ची ‘टाच’….वर्दीतल्या हावरट अधिकाऱ्या वरील करवाई ने पोलीस दलात खळबळ…!

सद रक्षणाय खल निग्रनाय हे ब्रीद पोलिसांच्या साठी वापरल्या जाते मात्र काही लाच खोर अथवा मुजोर अधिकारी कर्मचारी वर्गामुळे खाकी ला बदनामी चा डाग लागतो वास्तविक या पोलीस दलात अतिशय प्रामाणिक काम करून जनते च्या रक्षणासाठी व न्याय देण्यासाठी काम करण्याची संख्या मोठी आहे.
पण यवतमाळ अवधूत वाडी या हॉट स्पॉट असलेल्या पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रणधीर सावरकर या अधिकाऱ्यास १ लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याने यवतमाळ पोलीस दलात एकच खळबळ उडाली.
या बाबत वृत्त असे की,
एका मित्राला उसने म्हणून एका मित्राने १० लाख रुपये दिले त्याची मुदत ६ महिने होती मात्र कालावधी संपून देखील पैसे परत मिळत नाही हे पाहून त्या बाबत पोलीस स्टेशन अवधूतवाडी yavtmal police तक्रार दिली.
यात तक्रारदार इसमास उसने दिलेली रक्कम परत मिळवून देतो त्या मोबदल्यात ५ लाखाची लाच मागितली मात्र तक्रारदार व पोलीस निरीक्षक रणधीर सावरकर यांच्यात तडजोड होऊन ३ लाखाचा सौदा ठरला.
त्यातील पहिला हप्ता १ लाख रुपये देण्यापूर्वी तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती कडे फिर्याद दिली पडताळणी करून सापळा रचण्यात आला.
आणि एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना ठाणेदार रणवीर सावरकर यांना अटक करण्यात आली. c m o maharastra
रणधीर सावरकर हे वादग्रस्त ठरले होते आपल्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ते त्रास देत असत अशी चर्चा आहे.मात्र पैशाची हाव अंगलट आली असून आता पुढील काही महिने त्यांना अर्ध्या पगारावर आराम करण्याची वेळ आली व यवतमाळ पोलीस दलावर नामुष्की ओढवली आहे.

Related posts

डॉ.नीरज वाघमारे यांच्या पुढाकाराने पोलीस भरती मार्गदर्शन मेळावा; प्रा.विठ्ठल कांगणे यांचे सखोल मार्गदर्शन

bol maharashtra

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनो, आताच मोबाईलवर तपासा मेसेज; मिळेल खूष करणारी बातमी

Web1Tech

रस्त्यात झाड लावून गांधीगिरी ..! प्रहार च्या आंदोलनास यश रस्त्याचे काम झाले सुरू.

bol maharashtra