आर्णी शहर हे एकतेचे प्रतीक आहे तशी ही भूमी संतांची भूमी आहे येथे थोर संत बाबा कंबलपोष त्यांचे सेवक बच्चू बाबा थोर संत तपस्वी बाकी पुरी महाराज,ऋषी महाराज आदी होऊन गेले.
अरुणावती नदी तिरावर बाबा कंबलपोष दरगाह व पुरातन सिद्धेश्वर मंदिर आहे
.५ फेब्रुवारी पासून बाबा कंबलपोष उर्स शरीफ सुरू होत असून याच दिवशी त्यांचा शाही संदल निघेल त्याच प्रमाणे खलीफतुलऔलीया हजरत वहीदोद्दीन शहा उर्फ पेंटर बाबा यांचा शाही संदल ५ फेब्रुवारी रोजीच निगणार आहे.
हा भक्ता साठी दुर्मिळ व दुर्लभ योग असून हा योग शेकडो वर्षांत एखादे वेळी येतो.त्यामुळे भाविक भक्ता साठी ही एक भक्ती ची पर्वणी ठरणार आहे.
यवतमाळ रोड वरील महा मार्गालगत हजरत पेंटर बाबा यांचा देखील उर्स भरणार असून त्यांचा शाही संदल आर्णी शहरातून निघून पेंटर बाबा दरगाह दत्तरामपूर जवळ पोहचनार आहे.
बाबा कंबलपोष यात्रेची जय्यत तयारी पूर्ण झाली असून पेंटर बाबांच्या उर्स ची तयारी सुद्धा झाली आहे येथे विविध एकदिवसीय धार्मिक सामाजिक उपक्रम असतात तर कव्वाली व महा प्रसाद देखील असतो.
धर्म – कर्मआर्णीकरांना बाबांच्या उर्स ची आतुरता… दरगाह ट्रस्ट कडून तयारीला वेग…
आर्णीकरांना बाबांच्या उर्स ची आतुरता… दरगाह ट्रस्ट कडून तयारीला वेग…
आर्णीकरांना बाबांच्या उर्स ची आतुरता…
दरगाह ट्रस्ट कडून तयारीला वेग…
राज्यात प्रसिद्ध असलेल्या व सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या आर्णी च्या थोर संत बाबा कंबलपोष यांचा उर्स शरीफ(यात्रा महोत्सव)
पुढील महिन्यात फेब्रुवारी ५ तारखेला सुरू होत असून या उर्स ची आतुरता आर्णी शहर तालुका यवतमाळ जिल्हा व बाबांच्या भक्तांना देखील उर्स ची आता आतुरता लागली आहे.
उर्स च्या निमित्ताने आर्णी च्या मुलीबाळी माहेर येतात
पाहुणे सगे,सोयरे घरात आल्याने आर्णी साठी हा उत्सव अवर्णनीय असतो.
पाच दिवस मोठ्या उत्साहात भरणारा हा उर्स (यात्रा)झुले,मौत का कुंवा,खेळणी ,भांडी,इतर छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यापारी वर्गास पर्वणीच ठरते. दरवर्षी
बाबा कंबलपोष दरगाह ट्रस्ट यासाठी काटेकोर नियोजन करत असते.
दुकानाच्या जागेचे वाटप यात्रेत सुरक्षेसाठी सी सी टीव्ही व स्वयंसेवक असतात.यात्रेत धुळीचा त्रास होऊ नये म्हणून खास व्यवस्था केल्या जाते.
कव्वाली चे रसिक मोठ्या प्रमाणावर येतात त्यांचे साठी ६ फेब्रुवारी रोजी अमान साबरी मुंबई यांची कव्वाली तर ७ फेब्रुवारी रोजी शरीफ परवाज कानपुर उत्तर प्रदेश तर १० फेब्रुवारी रोजी शाकीब अली साबरी गोंडा उत्तर प्रदेश यांची कव्वाली होणार आहे.
तसेच ८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खंजरी भजन स्पर्धा,
९ फेब्रुवारी रोजी सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार, कीर्तनकार मराठी विनोदी प्रवचनकार पुरुषोत्तम पाटील बुलढाणा यांचा कार्यक्रम दरगाह ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
बाबा कंबलपोष दरगाह ट्रस्ट वर्षभर विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवित असते
उर्स मध्ये देखील ५ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी मोफत आरोग्य तपासणी ,नेत्र तपासणी शिबिर आयोजित करत असते.
स्वछता राहावी म्हणून नगरपरिषद आर्णी ची चमू,पंचायत समिती आर्णी ची चमू व सुरक्षेसाठी व वाहतूक व्यवस्थेस आर्णी पोलीस परिश्रम घेत असतात.
