Bol Maharashtra
धर्म - कर्म मोठी बातमी सामाजिक

आर्णी येथील ऐतिहासिक शिवपुरान साठी चोख व्यवस्था ठेवा,पालकमंत्री ना.संजय राठोड यांची प्रशासनास सूचना…!

आर्णी येथे पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिवपूरान आयोजित करण्यात आले आहे. यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील नव्हे तर राज्य व देशातून शिवभक्त आर्णीत लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

हा सोहळा दैदिप्यमान होणार असून यावेळी जिल्ह्यात व पर्यायाने शिवपुरान ऐकण्यासाठी येणाऱ्या भक्तांची कुठेही गैरसोय होऊ नये.

होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक व सुरक्षा व्यवस्था चोख ठेवावी.

स्वछतागृह व स्वच्छता याकडे विशेष लक्ष द्यावे अशा अनेक महत्वपूर्ण सूचना यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय भाऊ राठोड यांनी प्रशासनास दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी शिवपुरान आयोजन समिती कडून सर्व बारकावे समजून घेतले.या बैठकीत जिल्हाधिकारी विकास मीना,पोलीस विभागाचे अधिकारी व इतर सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

विशेष म्हणजे नामदार संजय राठोड यांना पोहरागड येथील यात्रेचा व धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराज यात्रेच्या आयोजनाचा प्रदीर्घ अनुभव आहे.त्या नुसार त्यांनी अगदी सुक्ष्म नियोजन कसे करावे याविषयी प्रशासन व आयोजन समितीस मार्गदर्शन केले.

Related posts

सिद्धार्थनगर में 03 मार्च को छटवे चरण में होंगे चुनाव, रहेगी सख्त पाबंदी

Web1Tech

मराठा सेवा संघाने समाजाला वैचारीक शिवजयंती दिली – आ.अभिजित पाटील

bol maharashtra

सुनील पोतगंटवार १६ वर्षा पासून करत आहेत जलसेवा,सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतुक..!

bol maharashtra