Bol Maharashtra
निवडणूक

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष साजिद शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश…!

आर्णी नगरपरिषद निवडणूक तोंडावर असतांना राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जोरदार धक्का देत आज राष्ट्रवादी (एस.पी.) चे आर्णी शहराध्यक्ष सादिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे घड्याळ हाती बांधली व राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस साजिद बेग यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली.
किंग मेकर म्हणून प्रसिद्ध साजिद बेग यांनी नगरपरिषद निवडणूक मनावर घेतली असून त्याची प्रचिती आता शहरात येत आहे.
गेली २ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काम सादिक शेख यांनी जोमात केले होते मात्र स्थानिक पातळीवरील घडामोडी पहाता त्यांनी साजिद बेग यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राज्यमंत्री ना.इंद्रनील नाईक हे आर्णी येथे आले असता हा पक्ष प्रवेश झाला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस साजिद बेग जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर,जिल्हा उपाद्यक्ष युनूस शेख,तालुका अध्यक्ष सुनील पोतगंटवार, सुरेश मोरलेवार,रामेश्वर चौधरी पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे आर्णी शहरातील पदाधिकारी व पत्रकार रंजना आडे व पत्रकार मंडळी उपस्थित होती.

Related posts

आर्णी नगरपरिषद सभागृहात डॉक्टर इंजिनिअर स्वीकृत…!

bol maharashtra

पहिल्या टप्प्यात २० जिल्हा परिषद व १२५ पंचायत समितीच्या निवडणूक..!

bol maharashtra

आर्णीत काँग्रेसचे नालंदा भरणे नगरादयक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ची मुसंडी,शिवसेना ४ तर शिवसेना उबाठा १ व भाजप ने खाते खोलले…!

bol maharashtra