Bol Maharashtra
बिना केटेगरी

जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने जीवनदाय महाकुंभ रक्तदान शिबिरास आरंभ..!

प्रतिनिधि: संदिप ढाकुलकर शिक्रापूर

जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने जीवनदाय महाकुंभ रक्तदान शिबिरास आरंभ..!

नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने रामानंद सांप्रदायाच्या भक्तांकडून दरवर्षी रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. त्याचप्रमाणे यावर्षी महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण परिषदेने नेमून दिलेल्या रक्तपेढ्यांमार्फत रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रामानंद सांप्रदायाच्या भक्तगणांकडून सामाजिक बांधिलकी जपत शिरूर तालुक्यात गावोगावी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर ४ ते १९ जानेवारी दरम्यान पंधरा दिवस शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कानूर मेसाई, कारेगाव हिवरे, टाकळी हाजी, कवठे यमाई ढोक सांगवी, टाकळी भीमा, शिरूर,

मलठण निर्वी पिंपरखेड करडे, मांडवगण फराटा, न्हावरे खंडाळे करंदी पाबळ कोंढापुरी या ठिकाणी करण्यात येणार आहे.

या शिबिरामध्ये नागरिकांसह तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आव्हान आयोजकांकडून करण्यात आले आहे. आपल्या दैनंदिन जीवनामधील फक्त पाच मिनिटे रक्तदानासाठी आवश्यक आहेत आपल्यासाठी रक्तदान आहे मात्र गरजूंसाठी ते जीवनदान आहे.
रामानंद संप्रदायाच्या वतीने रुग्णांची गरज लक्षात घेऊन जीवनदान महाकुंभरक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. तसेच दि.४ जानेवारी २०२६ रोजी शिक्रापूर ता . शिरूर (पुणे) येथे रक्तदान शिबीर घेण्यात आला या शिबिराचे उद्घाटन शिक्रापूरनगरीचे आदर्श सरपंच
श्री रमेश गडदे ,प्रहार संघटना मा.सरचिटणीस संदीप ढाकुलकर, रामानंद संप्रदायाचे भक्तगण सोमनाथ सूर्यवंशी, विजय पांचाळ,जालिंदर मांढरे, उमेश सोनवणे हे उपस्थित होते.

या वेळी शिक्रापूर या ठिकाणी २००+ रक्त कुपिकांचे संकलन करण्यात आले व पूर्ण महाराष्ट्रात ३१००० रक्त कुपिकांचे संकलन झाले व हे संकलन १९ जानेवारी २०२६ पर्यंत चालु असणार आहे अशी माहिती भक्तगण परिवाराने दिली आहे.

श्री रामानंदचार्यजी नरेंद्रचार्यजी यांच्या भक्तांचे हे कार्य अतिशय उल्लेखनीय आहे आणि कोरोना सारख्या महामारीमध्ये याचा प्रत्यय आपण सर्वांनाच आला आणि हे जीवनदानाचे कार्य निरंतर चालू रहावे असे प्रतिपादन आदर्श सरपंच श्री रमेश गडदे यांनी या वेळी बोल महाराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले

Related posts

पंढरीनाथ भाऊ गायकवाड यांच्या विजयाचा संकल्प,मतदारांचाउस्फुर्त प्रतिसाद

bol maharashtra

श्रीराम हेल्थ क्लब चा मुंबईत बोलबाला..!

bol maharashtra

निष्ठावंत युवा शिपायास उमेदवारी देण्याची मागणी…!

bol maharashtra