Bol Maharashtra
खेळ

भारतीय संघाचा विजयी श्री गणेशा,मात्र मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश…!

२०-२० विश्वचषक सामन्याचा पहिला सामना भारतीय संघाने जिंकला खरा पण नवख्या संघा विरुद्ध बलाढ्य मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नाही.

 

सूर्यकुमार यादवच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारतानं यूएसएवर   २९धावांनी मात केली आणि टी २०👌🏾 विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली.

मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या भारतानं यूएसएला विजयासाठी १६३ धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताच्या गोलंदाजांनी अमेरिकेला २० षटकांत ८बाद १३२ धावांवरच रोखलं.

ट्वेन्टी २० मध्ये पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद सिराजनं तीन विकेट्स काढत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं आणि वरूण चक्रवर्तीनं एक विकेट काढली आणि टीम इंडियाच्या विजयात वाटा उचलला.

त्याआधी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं झंझावाती फलंदाजी करत अक्षरशः मैदान दणाणून सोडलं आणि नाबाद ८४ धावांची खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला.

त्यामुळे भारताला डावाची काहीशी अडखळती सुरुवात होऊनही २०षटकांत ९ बाद १६२ धावांची मजल मारता आली.

नवख्या संघा विरुद्ध वाटली तेव्हढी धावसंख्या न केल्याने आता पुढील सर्व सामन्यात भारतीय संघाला फलंदाजीत कसब दाखवावे लागणार असल्याचे बोलले जाते.

Related posts

आर्णी पोलिसांनी जपली वर्दीतली माणुसकी…ठाणेदार निलेश सुरडकर यांनी वृद्धाश्रमास दिली ४० हजारा ची मदत…!

bol maharashtra

इंग्लंड संघाला नमवत भारताने अंतिमफेरी गाठली…!

bol maharashtra

लंकेच्या सिंहा समोर झिबोंबे च सिकंदर, शाही विजय…!

bol maharashtra