Bol Maharashtra
बिना केटेगरी

मतदारसंघाला नंदनवन करणारा लोकप्रतिनिधी म्हणजे ना. संजय भाऊ राठोड :पराग पिंगळे पश्चिम विदर्भ सह संपर्क प्रमुख शिवसेना

एखाद्या लोकप्रतिनिधीने मनावर घेतलं…
दृष्टी ठेवली…
आणि जनतेसाठी काम करण्याचा ध्यास घेतला…
तर कचरा साठवण्याची जागासुद्धा
क्रीडा नंदनवन बनू शकते…

जिथे पूर्वी दुर्गंधी होती…
तिथे भविष्यात तरुणाईच्या घामाचा सुगंध दरवळणार आहे…

जिथे कचऱ्याचे ढीग होते…
तिथे आज खेळाडूंची स्वप्नं उंच भरारी घेणार आहेत…

जिथे लोक जाणं टाळायचे…
तो परिसर आज मुलांच्या खेळाडूंच्या हास्याने दुमदुमणार आहे…

ही फक्त जागेची बदललेली ओळख नाही…
तर हा आहे विकासाच्या विचाराचा विजय…

दूरदृष्टी… इच्छाशक्ती…
आणि जनतेप्रती बांधिलकी असेल…
तर अशक्य काहीच नसतं…

कारण विकास म्हणजे
केवळ इमारती नव्हेत…
तर लोकांच्या जीवनात घडलेला सकारात्मक बदल असतो…

दारव्हा शहर विकासकामांच्या बाबतीत एवढेच म्हणता येईल
कष्टाच्या मातीतून उभं राहिलेलं शहर…
घामाने पिकलेली शेती…
उत्सवांनी सजलेली गल्ली…
आणि साध्या माणसांच्या स्वप्नांनी धडधडणारं मन…

काळ बदलत गेला…
पण शहराच्या विकासाची वाट
कुठेतरी थांबली होती…

आणि मग जन्माला आला एक ध्यास…
विकासाचा ध्यास…
जनतेच्या विश्वासाचा ध्यास…
मा. ना. संजयभाऊ राठोड…

एक नाव…
जे केवळ राजकारणात नाही…
तर दारव्ह्याच्या बदलत्या चेहरामोहरात दिसतं…

गोळीबार चौकात उभा असलेला
छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा…
फक्त पुतळा नाही…
तो स्वाभिमानाचा जागता इतिहास आहे…

वन उद्यानातील हिरवळ…
मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य…
ज्येष्ठांच्या चालण्यातला उत्साह…
आणि तरुणांच्या डोळ्यातील उमेद…
हेच तर विकासाचं खरं रूप आहे…

स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात
तरुणाई घडणार आहे…
घामातून स्वप्नं आकार घेणार आहेत
अद्यावत अभ्यासिकेत
गरीब घरातील मुलं
मोठी स्वप्नं पाहायला शिकत आहेत…
अनेक होतकरू तरुण शासकीय सेवेत व
निवडल्या गेले आहेत,

नवीन पोलीस स्टेशन…
नवीन बसस्थानक…
तहसील कार्यालय…
सभागृह…
शाळा…
व्यायामशाळा…
हाकेच्या अंतरावरील धामणगाव देव
येथील भक्त निवास…
देऊळगाव वळसा येथील महालक्ष्मी मंदिर…
कोर्टाची इमारत,trauma केयर सेंटर,
पूल…
रस्ते…
ही फक्त बांधकामं नाहीत…
ही उद्याच्या दारव्ह्याची पायाभरणी आहे…

समाजाच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन
विकासाची वाट चालणारा हा प्रवास…
आज दारव्हा शहराला
नवी ओळख देत आहे…
आणि म्हणूनच…

आज दारव्हा फक्त शहर राहिलेलं नाही…
तर ते बनलं आहे
स्वप्न… विकास… आणि विश्वास यांचं सुंदर चित्र…

अजून बरीच स्वप्नं बाकी आहेत…
अजून बरीच कामं बाकी आहेत…
पण दिशा योग्य आहे…
आणि जनतेचा विश्वास ठाम आहे…
कारण…

विकासाचा अविरत ध्यास आपले लोकप्रतिनिधी नात्याने काम करीत आहे…
आणि त्या ध्यासाचे नाव आहे
🚩 मा. ना. संजयभाऊ राठोड 🚩

शब्द
पराग पिंगळे
सह संपर्क प्रमुख
यवतमाळ

 

दारव्हा शहरातील विकासकामे

✅ छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा
✅ बचत भवन
✅ वन उद्यान – दारव्हा
✅ स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल
✅ स्व. बाळासाहेब ठाकरे अद्यावत अभ्यासिका
✅ अत्याधुनिक पोलीस स्टेशन
✅ नवीन बस स्थानक
✅ नवीन तहसील कार्यालय
✅ व्यापारी संकुल
✅ अत्याधुनिक नाट्यगृह
✅ साधुबुवा चिरडे वृद्धाश्रम
✅ बारी समाज भवन
✅ उत्तरेश्वर मंदिर भवन
✅ मल्लिकार्जुन महादेव मंदिर सभागृह
✅ डिजिटल शाळा – दारव्हा
✅ अहिल्यादेवी होळकर सभागृह
✅ शिवाजी व्यायाम शाळा
✅ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा
✅ सम्राट अशोक बुद्ध विहार
✅ दिग्रस बायपास रस्त्याचे सिमेंटीकरण
✅ जिल्हा व सत्र न्यायालय इमारत
✅ आयटीआय संस्था विकास
✅ बोरी अरब येथील पूल
✅ धामणगाव देव भक्त निवास
✅ वळसा येथील महालक्ष्मी मंदिर भक्त निवास

Related posts

शिरूर मांजरे वस्तीत मुलाचा मृत्यू, घातपात झाल्या चा कुटुंबियांनी केला संशय व्यक्त…!

bol maharashtra

bol maharashtra

जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी पीकविमा लाभा पासून वंचित रहाणार नाही, पालकमंत्री ना. संजय राठोड यांची ग्वाही पुढाकार घेऊन लवकरच तोडगा काढणार..!

bol maharashtra