Bol Maharashtra
कृषी

बळीराजाचा वीजपुरवठ्यासाठी एल्गार; आर्णी महावितरण कार्यालयात निवेदन सादर 

आर्णी : शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा मिळावा या मागणीसाठी रुद्रापूर, परसोडा, महाळुंगी, चिकणी तसेच परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी आर्णी येथील महावितरण कार्यालयात धडक देत निवेदन सादर केले.

 

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून शेतीपंपांसाठीचा वीजपुरवठा नियमित होत नसून सायंकाळी ७ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत वीज बंद ठेवली जाते किंवा कमी दाबाने (डीम लाईन) पुरवठा केला जातो. त्यामुळे पिकांना पाणी देताना मोठ्या अडचणी निर्माण होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

 

देशाचा अन्नदाता असलेला बळीराजा कोणतेही संकट असले तरी खंबीरपणे तोंड देत शेती करत आहे. नागरिकांना अन्नधान्याचा तुटवडा भासू नये यासाठी तो दिवसरात्र मेहनत घेत असतो. मात्र, शेतीसाठी आवश्यक असलेला नियमित वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

 

यावेळी शेतकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन परिसरातील गावांना २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. इतर भागांप्रमाणेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही अखंडित वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

 

या प्रसंगी रुद्रापूर येथील माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष **सुदाम खरगडे**, माजी पंचायत समिती सदस्य **विलास राऊत पाटील**, विविध गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Related posts

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला महसूल विभागाच्या मिशन उभारी ने दिली मायेची ऊब…!

bol maharashtra

नुकसानग्रस्त केळी व डाळिंब बागांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

bol maharashtra

पीएम-किसान लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य ३० जूनपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

bol maharashtra