Bol Maharashtra
निवडणूक

आर्णी च्या प्रचार सभेत ना.संजय भाऊ राठोड यांची तुफान फटकेबाजी..!

पालकमंत्री ना.संजय राठोड यांची आर्णीत तुफान फटकेबाजी
विरोधक लाख रुपयांचे विकास कामे करू शकणार नाहीत म्हणून शिवसेनेची सत्ता देण्याचे केले आवाहन…!

आर्णी नगरपरिषद २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आर्णी येथील भारती विद्यालया च्या मैदानात झालेल्या प्रचार सभेत ना.संजय भाऊ राठोड यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधकांना चिमटे काढले व विनोद करत उपस्थित सभे सोबत संवाद साधला.
विरोधकांची चुकून सत्ता आली तर ते कुठलेही विकासकामे घेऊन माझ्या कडे येणार नाहीत आणि मी त्यांच्या कडे जाणार नाही त्यामुळे ते लाख रुपयांचे विकास कामे देखील करू शकणार नाहीत.
मी पालकमंत्री आहो १००० कोटी रुपयांचे नियोजन करतो ४०० कोटींचा खनिकर्म विकास आराखडा माझ्या सहिने मंजूर होतो शिवाय नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे आहे.
जर आमची सत्ता आली आणि नगरादयक्ष व सर्व नगरसेवक बहुमताने सत्तेत आले तर एका वर्षात १०० कोटींचा विकास आराखडा करू तसे न झाल्यास सर्वांचे राजीनामे घेऊ असेही यावेळी ते म्हणाले निवडणूकित पाय धरनारे लोक निवडणूक झाली की मग गळा दाबायला मागे पुढे पहात नाहीत
पण आम्ही सेवेतून राजकारणात आलो गोर गरिबांना उपचार मिळत नाहीत त्यांना सरकारी दवसखाना हा पर्याय असतो म्हणून मी रुग्णसेवा सुरू केली एका झाडा खाली बसून टिनाच्या शेड मधून आणि आता तेथे मातोश्री रुग्ण मदत केंद्र आहे मी कुठलाही राजकिय वारसा नसताना केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी दिलेल्या आशीर्वादाने निवडणूक लढवली आज ५ वेळा आमदार व ३ वेळा मंत्री आहो.
आम्ही सेवेतून पुढे आलो आजही सेवा करणारे कार्यकर्ते म्हणून काम करतो
आर्णी च्या सर्वांगीण विकासासाठी आपण शिवसेनेला मतदान करावे
नगरादयक्ष पदाचा उमेदवार कुणाल नारायणराव मनवर व सर्व प्रभागात उभे असलेल्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन देखील पालकमंत्री ना.संजू भाऊ राठोड यांनी केले. यावेळी जिल्हा प्रमुख राजुदास जाधव यांचेही घणाघाती भाषण झाले सेटिंग च्या रसजकारणावर त्यांनी जोरदार प्रहार केला तर आम्ही तुम्हाला विकसित आर्णी चा शब्द देतो असेही ते म्हणाले.प्रसंगी जेष्ठ नेते जिवन पाटील यांनीही मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर जिल्हा संपर्क प्रमुख श्रीधर काका मोहड,उपजिल्हा प्रमुख विष्णू उकंडे,जिल्हा सह संपर्क प्रमुख रवी राठोड,नगरादयक्ष पदाचे उमेदवार कुणाल मनवर,
शेतकरी सेनेचे पश्चिम विदर्भ समनवयक प्रमोद कुदळे,तालुका प्रमुख राजेंद्र जाधव , माजी नगरपरिषद सभापती निलेश गावंडे, विधानसभा संपर्क प्रमुख जाकीर सोलंकी, महिला आघाडी तालुका प्रमुख अश्विनी देशमुख, आर्णी शहर प्रमुख सुरेश पवार,महिला आघाडी शहर प्रमुख संध्या मुनेश्वर युवासेना तालुका प्रमुख गौरव बोरकर,युवा सेना शहर प्रमुख मोहित नेमाडे उपस्थित होते सनचलन शहर प्रमुख सुरेश पवार यांनी तर प्रस्ताविक तालुका प्रमुख राजेंद्र जाधव यांनी केले सभेला सर्व शिवसेना उमेदवार व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Related posts

गोपाल वानखडे बँक प्रतिनिधी म्हणून विजयी,आद्यक्षाचे मत ठरले निर्णायक…!

bol maharashtra

निताताई राजेश आडे यांचा विजयाचा श्रीगणेशा..बँक प्रतिनिधी म्हणून अविरोध निवड….!

bol maharashtra

त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान,पुंजानी यांची याचिका उद्याच सुनावणी…!

bol maharashtra