Bol Maharashtra
बिना केटेगरी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधक हतबल का झाले असावे…?

राज्यात २०२४ ला लोकसभा निवडणुकीत महा विकास आघाडीने चांगले यश मिळवले व केंद्रात भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमताचा स्वबळावर आकडा गाठू दिला नाही.
मात्र त्या नंतर सहा महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार मधील भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी विधान सभा जीकण्यासाठी अनेक लोकप्रिय योजनांचा धडाका लावला जसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यात महिलांना १५०० रुपये दर महा एस टि प्रवास भाड्यात ५०% सूट मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ,सरपंच, पोलीस पाटील मानधनात वाढ व अनेक लोकप्रिय निर्णय घेतले आणि विरोधक मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विरोध करण्यात व संविधान वाचवा ओरडत राहिले अन विधानसभा निवडणुकीत महा विकास आघाडी ला जलीन स्वीप देत महा युती ने प्रचंड बहुमत मिळवले.विरोधकांचा कोण्या एका पक्षाचा विरोधी पक्ष नेता देखील होऊ शकणार नाही ही हालत विरोधक महा विकास आघाडी ची झाली.
भरीस भर म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित एन डी ए ने प्रचंड बहुमत मिळवले हे बहुमत महाराष्ट्र राज्यातील बहुमता पेक्षा अधिक होते तेथे देखील नितीश कुमार च्या सरकारने लाडक्या बहिणीला १०००० रुपये दिले.अन एक लाखाचा वादा केला.
आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या निवडणुका पूर्वी विरोधक पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील घोळ पटवून देत आक्रमक होते त्यामुळे महा विकास आघाडी चे मोठे नेते आक्रमकपणे सत्ताधारी महा युतीला घेरतील असे वाटत असतांना चित्र मात्र वेगळे पहायला मिळाले.
राज्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना,उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादि कॉग्रेस फ्रंट फूट वर खेळले तर शिवसेना उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, मनसे काँग्रेस ने रान मोकळे सोडले फक्त स्थानिक आमदार खासदार मात्र प्रतिष्ठा जपण्यासाठी लढले मात्र कोणीही राज्य पातळी वरचा बडा नेता आक्रमक पुढे आला नाही
आता निवडणुका झाल्या मत मोजणी पुढे ढकलून निवडणूक आयोगाने विरोधकांना कोलीत दिले असले तरी राज्यात झालेल्या कार्यकर्त्या च्या निवडणुकीत मविरोधक दूर का होते हे न उलगडणारे कोडे आहे कदाचित ऊर्जा व पैसा हा महा नगर पालिका व जिल्हा परिषद निवडणुकी साठी वाचवला असावा असे म्हणावे लागेल.
प्रमोद कुदळे
संपादक बोल महाराष्ट्र..

Related posts

शहराच्या विकासासाठी शिवसेनेला विजयी करा:ना.संजय राठोड

bol maharashtra

जि. प. प्राथमिक शाळा शिक्रापूर मधील नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न ..!

bol maharashtra

थाना चिल्हिया पुलिस टीम द्वारा बेहोश पाए गए बालक को दवा इलाज कराने व होश में आने के बाद उसके परिजनो को तलाश कर सुपुर्द किया गया

Web1Tech