Bol Maharashtra
निवडणूक

जि . प . पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या ; उत्सुकता शिगेला .!

प्रतिनिधि ✒️संदिप ढाकुलकर

जि . प . पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या ; उत्सुकता शिगेला .!

शिक्रापूर (पुणे) येत्या सात तारखेला होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता सोशल मीडिया व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम या सारख्या माध्यमातून आपलाच उमेदवार कसा कामाचा आहे याची माहिती देत आहे शिक्रापूर कासारी पंचायत समिती गणात निवडणुकीत चुरस बघायला मिळत आहे या लढतीत महाराष्ट्रात युती असलेले राष्ट्रवादी काँग्रेस दिवंगत अजितदादा पवार आणि भारतीय जनता पार्टी याच दोन प्रमुख पक्षात काट्याची लढत होत आहे शिक्रापूर कासारी पंचायत समिती गणात ही निवडणूक चर्चेचा विषय बनली आहे श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत असल्यामुळे बाहेरील कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात येथे स्थायिक झाले असून त्यांचे मतदान सुद्धा स्थानिक मतदानापेक्षा जास्त आहे परप्रांतीय मतदार सुद्धा येथे दहा ते पंधरा वर्षांपासून स्थायिक झाल्यामुळे सहाजिकच त्यांचे सुद्धा मतदान महाराष्ट्रात आहे याच कारणामुळे बाहेरील मतदानाच्या भरवशावरच उमेदवारांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे शिक्रापूर कासारी पंचायत समिती गणातील ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाल्यामुळे लक्ष्मीची कृपा सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदार राजावर होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे भावनिक वातावरण तयार झाले आहे पण एकंदरीत पाहता नगरपरिषद आणि नगरपालिका या निवडणुकीमध्ये भाजप पक्षच वरचढ राहिला असल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीत भाजपच बाजी मारेल असे चिन्ह सध्या बघायला मिळत आहे त्यामुळे या निवडणुकीत भाजपच वर चढ राहील की अजितदादांच्या अकाली निधनामुळे भावनिक वातावरण तयार होऊन स्वर्गीय अजित दादा यांना मतदार राजा श्रद्धांजली अर्पण करतील काय ? याची उत्सुकता शिगेला पोचली आहे प्रमुख पक्षाचे उमेदवार गुलाल आपलाच असणार याचा आत्मविश्वास बाळगून आहे पण सुज्ञ मतदार राजा आपल्या मताचे दान कोणाच्या झोळीत टाकेल हे येत्या नऊ तारखेला स्पष्ट होईल

Related posts

वर्षाताई वसंतराव शिंदे बँक प्रतिनिधी म्हणून अविरोध…!

bol maharashtra

निकाल लागे पर्यंत आकडेमोड,उमेदवारांचा खर्च वाढणार…!

bol maharashtra

यवतमाळ नगर परिषद: आजी-माजी मंत्र्यांची ‘प्रतिष्ठा’ पणाला.!

bol maharashtra