Bol Maharashtra
धर्म - कर्म

ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या डोक्यावरून विधिवत निघाला शाही संदल…!

आर्णी पोलीस स्टेशन ची इमारत ही ब्रिटिश काळातील आहे येथे ठाणेदार बंगला आहे.अख्यायिकेनुसार आर्णी चे थोर सुफी संत बाबा कंबलपोश हे आर्णीत ठाणेदार बंगल्यात एका ठिकाणी विश्रांती करत असत तेव्हा पासून या जागेची विधिवत नियमित पूजा प्रार्थना होते.

ठाणेदार बंगला हा आर्णी च्या जुन्या वस्तीत आहे.जेव्हा बाबा कंबलपोश यांच्या स्मृती प्रित्यर्थ यात्रा उर्स भरण्याचा निर्णय बाबांचे सेवक भक्त  बच्चू बाबा यांनी घेतला तेव्हा संदल कोणाच्या डोक्यावर न्यायचा हा प्रश्न होता पण कुठेही  राजकिय हस्तक्षेप होऊ नये म्हणून संदल डोक्यावर घेण्याचा सन्मान तेव्हा ठाणेदार यांना देण्यात आला तेव्हा पासून ९० वर्षा पेक्षा अधिक काळ होऊन ही परंपरा चालत आहे.

५ फेब्रुवारी पासून आर्णीत बाबा कंबलपोश उर्स सुरवात होते याच दिवशी सायंकाळी वाजत गाजत मोठ्या उत्साहात भक्ती भावाने आर्णी पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर व त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी शाही संदल काढला यावेळी दरगाह ट्रस्ट चे सर्व मान्यवर व पोलिस कर्मचारी आणि मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.

Related posts

बंजारा समाजाची संस्कृती,विरासत जपण्यासाठी संजय राठोड यांनी केलेले परिश्रम उल्लेखनीय…!

bol maharashtra

भक्तीरसात आर्णी न्हाहून निघणार,भक्तांच्या गर्दी चा होणार नवा इतिहास आयोजन समिती,प्रशासन सज्ज,पंडित मिश्रा यांच्या अमृतवानीतून ३० मार्च पासून शिवपुरान कथेला सुरवात

bol maharashtra

श्री कान्होबा महाराज देवस्थान, म्हसोला – अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा,राजू भाऊ विरखडे यांनी दिली भेट…

bol maharashtra