Bol Maharashtra
महाराष्ट्र मोठी बातमी सामाजिक

अद्विता बँकेने जपली सामाजिक बांधिलकी, जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रातील महिलांचा केला सत्कार,नारी शक्ती चा जागर…!

जागतिक महिला दिनानिमित्त अद्विता अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., यवतमाळ-आर्णी तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित महिलांचा सत्कार सोहळा*

आर्णी :आयोजित करण्यात आला. होता कार्यक्रम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल वाकोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रातील योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला.

सत्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते महिलांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी महिलांचे समाजातील स्थान, त्यांचे कर्तृत्व आणि महिला सक्षमीकरणाचे महत्त्व यावर आपले मनोगत व्यक्त केले.जिद्द, कर्तृत्व आणि आत्मविश्वासाच्या रंगांनी उजळणारी नारीशक्ती ही समाजाच्या प्रगतीची खरी प्रेरणा आहे.
आज महिला शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा आणि प्रशासन अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या मेहनत, धैर्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर नवे यश संपादन करत आहेत.

प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याला, कर्तृत्वाला आणि योगदानाला मनापासून सलाम!

कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, मान्यवर नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे महिलांच्या कार्याला प्रोत्साहन मिळून समाजात सकारात्मक संदेश गेला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आणि या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून लाभलेले महिला बालकल्याण सभापती सौ. चैताली विशाल देशमुख, स्वीकृत नगरसेविका सौ.डॉ नाहीद आरीज बेग, सरपंच सौ.स्वप्ना अतुल देशमुख, एडवोकेट अरुणा राठोड,बांधकाम सभापती सौ अंजली संदीप खंदार, नगरसेविका सौ. प्रीती योगेश शिवरामवर, सौ. डॉ. सोनाली गंभीरे नगरसेविका सौ.अश्विनी संजय राऊत

सौ.आशा हिरामण जाधव, सौ. नंदाताई क्षीरसागर, श्रीमती सोनल मिश्रा, सौ. जयस्वाल मँडम, सौ. विमल क्षीरसागर, सौ. दीपिका वाकोडे, सौ. अश्विनी क्षीरसागर, सौ. प्रीती मतपलवार, सौ. वैभवी निरगुडे, सौ. पूजा क्षीरसागर, सौ. स्मिता ठाकरे. सौ ऐश्वर्या वाकोडे, व समस्त महिला कर्मचारी मान्यवर व बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते

Related posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूर येथे इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मेळावा आयोजित ..!

bol maharashtra

आर्णी महापुरान कथे दरम्यान मुस्लीम समाजाने जपला धार्मिक सदभाव…!

bol maharashtra

किरीट सोमय्या यांच्या त्या दौऱ्याने आर्णीत विविध चर्चेला पेव…!

bol maharashtra