Bol Maharashtra
Last 24 Hour

स्मार्ट मीटर बसविण्यास ग्रामस्थांचा विरोध; पारवा येथे एमएसईबी कर्मचाऱ्यांना माघारी पाठवले

मानोरा.ता. प्रतिनिधी/भाविक चतुरकार

पारवा:- येथे स्मार्ट मीटर बसविण्यासाठी आलेल्या महावितरण (एमएसईबी) कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी विरोध दर्शवत माघारी पाठविल्याची घटना घडली. यावेळी युवा कार्यकर्ते **ऋषी चौधरी** यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांची भूमिका मांडली.

 

सध्या खरीप हंगामातील पेरणीची लगबग सुरू असून शेतकरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक कामांमध्ये व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत गावात स्मार्ट मीटर बसविण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांकडून घाईघाईने काम सुरू करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. स्मार्ट मीटरबाबत अनेक नागरिकांच्या मनात शंका व संभ्रम असल्याने ग्रामस्थांनी या कामाला विरोध दर्शविला.

 

ही माहिती मिळताच ऋषी चौधरी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांच्या भावना व आक्षेप कर्मचाऱ्यांसमोर मांडत नागरिकांची संमती घेतल्याशिवाय कोणतीही जबरदस्ती करू नये, अशी भूमिका घेतली. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी तेथून माघार घेतल्याचे सांगण्यात आले.

 

यावेळी ग्रामस्थांनी ऋषी चौधरी यांचे आभार व्यक्त करत गावाच्या प्रश्नांसाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले.

 

 

*”ग्रामस्थांच्या इच्छेविरुद्ध कोणतीही मनमानी किंवा दबंगगिरी आम्ही सहन करणार नाही. नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. गावातील तसेच संपूर्ण सर्कलमधील नागरिकांच्या हक्कांसाठी आम्ही ठामपणे उभे राहू,”*

ऋषी चौधरी

Related posts

गनमैन ने खुद को गोली मार अपनी जीवन लीला की समाप्त।

Web1Tech

गोपाल वानखडे बँक प्रतिनिधी म्हणून विजयी,आद्यक्षाचे मत ठरले निर्णायक…!

bol maharashtra

इजनी च्या मुख्याध्यापकाने केला भंगारावर हाथ साफ,पवन पाचकोरे यांनी केली तक्रार…!

bol maharashtra